Ayodhya Ram Temple: पहिल्याच पावसानंतर राम मंदिराच्या छताला गळती, ड्रेनेजची व्यवस्था नाही; मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांचा दावा (Video)
रामलल्ला विराजमान असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते. एक-दोन दिवसांत याबाबत काही व्यवस्था केली नाही, तर दर्शन आणि पूजा थांबवावी लागेल, असेही ते म्हणाले.
Ayodhya Ram Temple: रामनगरी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन होऊन सहा महिनेही झाले नाहीत, त्यात पहिल्याच पावसात राम मंदिराचे छत गळू लागले आहे. राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले की, पहिल्याच पावसात छतावरून पाणी टपकू लागले. रामलल्ला विराजमान असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते. एक-दोन दिवसांत याबाबत काही व्यवस्था केली नाही, तर दर्शन आणि पूजा थांबवावी लागेल, असेही ते म्हणाले. शनिवारी रात्री दोन ते पाच वाजेपर्यंत पाऊस झाला. त्यावेळी गर्भगृहासमोरील मंडप चार इंच पाण्याने भरला होता. वीज पडण्याची भीती लोकांना वाटत होती. त्यामुळे पहाटे 4 वाजताची आरती टॉर्चच्या प्रकाशात करावी लागली. सहा वाजताची आरतीही याच पद्धतीने झाली. परिसरात जी छोटी मंदिरे बांधण्यात आली आहेत त्यातही पाणी भरले आहे. राम मंदिरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याची माहितीही दास यांनी दिली. (हेही वाचा: Kerala Rename: केरळ राज्याचे नाव बदलून 'केरळम' करण्याचा निर्णय; विधानसभेत ठराव मंजूर)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)