Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धेचं राम मंदिर 23 जानेवारीपासून पूर्ण वेळ भाविकांसाठी खुलं राहणार- Champat Rai यांची माहिती

अयोद्धेतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेपूर्वी उद्या 16 जानेवारीपासून विविध पूजा-विधींना सुरूवात होणार आहे.

अयोद्धा राम मंदिर | Twitter

अयोद्धेमधील भगवान श्रीरामांच्या मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. आज चंपत राय, General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra trust यांनी माहिती देताना 12.20 ते 1 या वेळेमध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण होणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच मंदिर भाविकांसाठी 23 जानेवारीच्या सकाळपासून खुलं असणार आहे. 21,22 जानेवारीला मंदिर भाविकांना बंद ठेवण्याचा विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले आहेत. अयोद्धेतील मंदिरासाठी नेपाळमध्ये असलेल्या सीता माईंच्या जन्मस्थळावरूनही हजारो गिफ्ट्स आल्याचं ते म्हणाले आहेत. Ram Mandir: अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु, पहा खास व्हिडिओ .

राम मंदिर भाविकांसाठी कधी होणार खुलं?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now