Ayodhya Horror: रामजन्मभूमी मंदिरातील महिला सफाई कर्मचाऱ्यावर मित्र आणि त्याच्या साथीदारांकडून सामूहिक बलात्कार; गुन्हा दाखल
16 ऑगस्ट रोजी वंश आणि त्याच्या मित्रांनी तिला फिरण्याच्या बहाण्याने अंगुरी बाग येथील एका गेस्ट हाऊसमध्ये नेले आणि तेथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला.
अयोध्येतील रौनाही पोलीस स्टेशन परिसरात बीएची विद्यार्थिनी आणि रामजन्मभूमी मंदिरात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोप आहे की, मुलीच्या मित्राने आणि त्याच्या साथीदारांनी तिचा विनयभंग करून सामूहिक बलात्कार केला. या मुलीवर तरुणांनी तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केला. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून कँट पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
पीडितेने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ती सहादतगंज येथील वंश चौधरी या आरोपींपैकी एकाला गेल्या चार वर्षांपासून ओळखत होती. 16 ऑगस्ट रोजी वंश आणि त्याच्या मित्रांनी तिला फिरण्याच्या बहाण्याने अंगुरी बाग येथील एका गेस्ट हाऊसमध्ये नेले आणि तेथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर, त्यांनी तिला बनवीरपूर येथील गॅरेजमध्ये नेले, तेथे वंशने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा मित्र शिवने दारूच्या नशेत तिचा विनयभंग केला. विनयने तिला देवकाली बायपासजवळ सोडल्यानंतर 18 ऑगस्टपर्यंत पीडित मुलगी आरोपींच्या तावडीत होती. 22 आणि 23 ऑगस्टच्या रात्री वंश आणि विनयने त्याच गॅरेजमध्ये पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा: Rampur Horror: उत्तर प्रदेशमध्ये व्यसनाधीन पतीने जुगारात पत्नीला लावले पणाला; दिली मित्रांना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची परवानगी, गुन्हा दाखल)
महिला सफाई कर्मचाऱ्यावर मित्र आणि त्याच्या साथीदारांकडून सामूहिक बलात्कार-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)