Rampur Horror: उत्तर प्रदेशमध्ये व्यसनाधीन पतीने जुगारात पत्नीला लावले पणाला; दिली मित्रांना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची परवानगी, गुन्हा दाखल

महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. या व्यसनात त्याने जमीन आणि दागिने गमावले. पती दारूच्या नशेत मित्रांना घरी घेऊन यायचा आणि जुगार खेळायचा. या जुगारात त्याने आपल्या पत्नीला पणाला लावले आणि आपल्याला मित्रांना पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्याची परवानगी दिली.

Rampur Horror: उत्तर प्रदेशमध्ये व्यसनाधीन पतीने जुगारात पत्नीला लावले पणाला; दिली मित्रांना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची परवानगी, गुन्हा दाखल
Representative Image (Photo Credits: Pixabay)

आजकाल दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. इथल्या रामपूरमध्ये एका पतीला जुगार आणि दारूच्या वाईट सवयींनी अक्षरशः पशू बनवले. या पतीने मित्रांसोबत जुगार खेळताना चक्क आपल्या पत्नीला पणाला लावले आणि मित्रांना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याची परवानगी दिली. ही महिला तीन लहान मुलांची आई आहे. याला प्रकाराला पत्नीने विरोध केल्यावर त्याने पत्नी आणि तीन मुलांना घराबाहेर हाकलून दिले. एसपींच्या आदेशानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहवालानुसार, शाहबाद कोतवाली भागातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेचा विवाह मुरादाबादच्या बिलारी भागातील गावात राहणाऱ्या वीरेशसोबत 6 जुलै 2013 रोजी झाला होता. लग्नाच्या वेळी मुलीच्या वडिलांनी त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त हुंडा दिला होता, मात्र तरीही लग्नानंतर सासरचे लोक महिलेचा हुंड्यासाठी छळ करत होते. (हेही वाचा: UP Shocker: जुगारात हरल्यानंतर पतीने पत्नीला ठेवले गहाण; महिलेच्या भावाने येऊन वाचवली लाज, गुन्हा दाखल)

महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. या व्यसनात त्याने जमीन आणि दागिने गमावले. पती दारूच्या नशेत मित्रांना घरी घेऊन यायचा आणि जुगार खेळायचा. या जुगारात त्याने आपल्या पत्नीला पणाला लावले आणि आपल्याला मित्रांना पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्याची परवानगी दिली. त्यानंतर पत्नी तिच्या आईच्या घरी गेली. नंतर काही दिवसांनी पती आणि त्याचे मित्र पत्नीला आणायला तिच्या माहेरी गेले. तिथे त्यांनी महिलेचे बोट तोडले आणि तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनी तिला मारहाणही केली, जेव्हा शेजारी जमले तेव्हा ते पळून गेले. आपला पती त्याच्या मित्रांवर कारवाई व्हावी अशी तिची इच्छा आहे. याबाबत रामपूरचे पोलीस अधीक्षक विद्यासागर मिश्रा यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2024 09:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).