Ayodhya Flight Video: जय श्री रामच्या जयघोषाने दिल्ली-अयोध्या पहिल्या विमानाला सुरुवात, कॅप्टन शेखर यांनी केले भाविकांचे स्वागत

विमानातील प्रवाशांमध्ये मोठा उत्साह होता. अनेक प्रवाशांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. काही प्रवाशांनी जय श्री रामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले.

Ayodhya Flight Video: जय श्री रामच्या जयघोषाने दिल्ली-अयोध्या पहिल्या विमानाला सुरुवात, कॅप्टन शेखर यांनी केले भाविकांचे स्वागत

श्रद्धेची नगरी असलेल्या अयोध्येत इतिहास रचला गेला आहे. शनिवारी, 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदींनी महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Maharishi Valmiki International Airport, Ayodhya Dham) उद्घाटन केले. त्यानंतर अयोध्या धामसाठी इंडिगोचे पहिले विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. या उड्डाणाची कमान अनुभवी पायलट कॅप्टन आशुतोष शेखर (Captain Ashutosh Shekhar) यांनी घेतली होती. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी कॅप्टन शेखर यांनी प्रवाशांचे मनापासून स्वागत केले आणि या ऐतिहासिक क्षणाचा एक भाग असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या विशेष विमानाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही त्यांच्यासाठीही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. विमानातील प्रवाशांमध्ये मोठा उत्साह होता. अनेक प्रवाशांनी हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. काही प्रवाशांनी जय श्री रामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2023 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).