Asaram Bapu Convicts in Rape Case: बलात्कार प्रकरणात आसाराम बापू दोषी; उद्या सुनावली जाणार शिक्षा
या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी आहेत.
आसाराम बापूच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. 2013 सालच्या बलात्कार प्रकरणात त्याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून उद्या त्याची शिक्षा जाहीर होणार आहे. त्या प्रकरणात न्यायालयाने अन्य आरोपींना निर्दोष ठरवले आहे. 2013 च्या प्रकरणात आसाराम बापूवर सुरतच्या एका मुलीवर 2001 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याचवेळी नारायण साईवर याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. 2013 मध्ये सुरतमधील या मुलीने आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता तेव्हा या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी आहेत. या प्रकरणात 68 जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात आसारामसह सात जणांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)