Arvinder Singh Lovely Resign : अरविंदर सिंग लवली यांच्याकडून दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा; आपसोबत केलेल्या युतीबद्दल नाराजी व्यक्त

लोकसभा निवडणुक २०२४ साठी आपसोबत युती करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत अरविंदर सिंग लवली यांच्याकडून दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Photo Credit- X

Arvinder Singh Lovely Resign : लोकसभा निवडणुकीसाठी आपसोबत युती करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत अरविंदर सिंग लवली (Arvinder Singh Lovely) यांनी रविवार, 28 एप्रिल रोजी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष (Delhi Congress President) पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी लिहिले की, "दिल्ली काँग्रेस युनिट आपसोबत युती करण्याच्या विरोधात होती. आपकडून नेहमीच काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तरीही, पक्षाने आपसोबत युतीचा निर्णय घेतला. त्यामुळे अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. (हेही वाचा:Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ NRIs कडून गुजरात मध्ये Ahmedabad ते Surat कार रॅली )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now