Arvind Kejriwal Arrest: सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना केली अटक; तिहार तुरुंगातून घेतले ताब्यात

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी, भाजपचे केंद्र सरकार केजरीवाल यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचत असल्याची भीती व्यक्त केली होती.

Arvind Kejriwal (File Image)

Arvind Kejriwal Arrest: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मंगळवारी रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात चौकशी केली आणि दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक केली. अरविंद केजरीवाल यांना उद्या बुधवारी संबंधित ट्रायल कोर्टात हजर करण्याची परवानगीही सीबीआयला मिळाली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. ईडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीपूर्वी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामीनाला स्थगिती दिली होती.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपूर्वी आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी, भाजपचे केंद्र सरकार केजरीवाल यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचत असल्याची भीती व्यक्त केली होती.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)