Poonch मध्ये शेलिंग दरम्यान नुकसान झालेल्या घरांना लष्कराकडून मदतीचा हात; दारोदारी जाऊन अन्नपदार्थांचे वाटप (Watch Video)

लष्करातील जवान सध्या पुंछ मध्ये घरा घरात जाऊन रेशन, औषध आणि अन्य साम्रगीचं वाटप करत आहेत.

Indian Army goes door-to-door in areas of Poonch | X@DDNewslive

जम्मू कश्मीर मध्ये एलओसी वर असलेल्या पुंछ गावात भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अनेक घरांचे नुकसान झाले. नागरिकांना या काळात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते मात्र आता तणाव विरल्यानंतर पुन्हा घरी आलेल्या नागरिकांना आता लष्कर मदतीचा हात देत आहे. दारोदारी जाऊन लष्करातील जवान अन्नपदार्थांचे, आवश्यक रेशन मधील पदार्थांचा पुरवठा करत आहेत. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील कश्मीर मध्ये सैन्य दलाच्या जवानांना भेटायला पोहचले होते. त्यांनीही समोरून दहशतवादी हल्ला होत नाही तो पर्यंतच ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

लष्कराकडून पुंछ मध्ये मदतीचा हात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement