One Nation-One Election Committee: एक देश, एक निवडणुकीसाठी समिती जाहीर, अमित शहा-अधीर रंजन यांच्यासह या 8 जणांचा समावेश
कायदा मंत्रालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
मोदी सरकारला 'वन नेशन, वन इलेक्शन'ची अंमलबजावणी करायची आहे. कायदा मंत्रालयाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अमित शहा, अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, एनके सिंग, सुभाष कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी यांचा समावेश आहे.
'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, 'आता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल येईल त्यावर चर्चा केली जाईल. संसद परिपक्व आहे आणि तिथे चर्चा होईल. घाबरण्याची गरज नाही... भारताला लोकशाहीची जननी म्हटले जाते, तिथे विकास झाला आहे... संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या अजेंड्यावर मी चर्चा करणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)