Animal Cruelty in Jabalpur: शेतात गाय घुसली म्हणून शेतमालकाचे मुक्या प्राण्यावर अमानुष अत्याचार; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला लोखंडी रॉड, पोलिसांकडून अटक
या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शेतमालकाचा अमानवी चेहरा पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
Animal Cruelty in Jabalpur: मध्य प्रदेशातील जबलपूरमधील पानगर भागात गायीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. येथे एका शेतकऱ्याने शेतात गाय घुसली म्हणून, आधी तिला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. यानेही त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने गाईच्या तोंडात व मूत्रमार्गात लोखंडी रॉड घुसवला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शेतमालकाचा अमानवी चेहरा पाहायला मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. ही घटना केवळ गायीवर झालेल्या हल्ल्याचीच नाही, तर तिच्यासोबतच्या अमानुष वागणुकीचीही आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी लोकांनी सुरू केली. या अमानुष कृत्याविरोधात गाय मालक अजय तिवारी यांनी पानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अजय सिंह यांनी सांगितले की, गायीच्या मालकाने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये आरोपी मंशाराम पटेल गायीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करताना दिसत आहे. (हेही वाचा: Python Attack Snake Handler Video: साप हाताळणाऱ्या व्यक्तीवर विशाल अजगरने अनेकदा केला हल्ला, पाहा व्हिडिओ)
मुक्या प्राण्यावर अमानुष अत्याचार-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2024 08:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

