ANI Sues PTI For Copyright Infringement Plagiarism: न्यूज एजन्सी एएनआयने ठोकला पीटीआयवर दावा; कॉपीराइट उल्लंघन प्रकरणी मागितली 2 कोटींची नुकसान भरपाई
एएनआयने आरोप केला आहे की, त्यांचा मूळ व्हिडिओ पीटीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बेकायदेशीरपणे पोस्ट केला होता आणि कोणतेही क्रेडिट न देता तो स्वतःचा असल्याचा दावा केला होता.
ANI Sues PTI For Copyright Infringement Plagiarism: न्यूज एजन्सी एएनआय मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने, दिल्ली उच्च न्यायालयात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) विरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा खटला दाखल केला आहे. पीटीआयने आपला मजकूर चोरल्याचा आरोप एएनआयने केला आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी आज या प्रकरणाची सुनावणी केली आणि याप्रकरणी समन्स बजावले. माहितीनुसार, एएनआयने पीटीआयवर त्याच्या कॅमेरापरसनने शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर बेकायदेशीरपणे पुन्हा चालवल्याचा आरोप केला आहे. नवी दिल्ली ते दरभंगा या फ्लाइटमधील एका प्रवाशासोबत मुलाखतीचा हा व्हिडिओ आहे.
एएनआयने आरोप केला आहे की, त्यांचा मूळ व्हिडिओ पीटीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बेकायदेशीरपणे पोस्ट केला होता आणि कोणतेही क्रेडिट न देता तो स्वतःचा असल्याचा दावा केला होता. एएनआयने पीटीआयवर खटला दाखल करत, नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कॉपीराइट उल्लंघनामुळे झालेल्या नुकसानीसाठी एएनआयने पीटीआयकडून 2 कोटी आणि 10 लाख रुपयांची आर्थिक भरपाईही मागितली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 09 ऑगस्ट रोजी होणार आहे. (हेही वाचा: Airtel Data Breach 2024: Bharti Airtel ने फेटाळले 'Data Breach' चे दावे; 'हा केवळ नाव खराब करण्याचा प्रयत्न' - कंपनीची माहिती)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)