Andhra Pradesh: महिलेला प्रसूतीनंतर झोळीमधून रुग्णालयात नेण्यात आले, मुलाचा मृत्यू (Watch Video)

ही महिला 5 महिन्यांची गर्भवती होती आणि तिने घरीच मुलाला जन्म दिला होता.

Makeshift Palanquin

आंध्र प्रदेशच्या अनकापल्ली (Anakapalli) येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथल्या डोंगराळ भागामुळे, रोलुगुंटा (Rolugunta) तालुक्यातील एका महिलेला चक्क झोळीमधूल रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही महिला 5 महिन्यांची गर्भवती होती आणि तिने घरीच मुलाला जन्म दिला होता. या महिलेला तीन पुरुषांनी झोळीमधून रुग्णालयात नेले. रुग्णालयात तिच्या मुलाला मृत घोषित करण्यात आले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा व्हिडीओ समोर आला असून, तो आता व्हायरल होत आहे.

पहा फोटो आणि व्हिडीओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now