Andhra Pradesh: तब्बल 25 किलो सोने परिधान करून पुण्याचे 'गोल्डन गाईज' पोहोचले तिरुमलाला; श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात घेतले दर्शन (Watch Video)

चष्मा, दाढी आणि गळ्यात जड सोने घातलेले गोल्डन गाईज जेव्हा मंदिरात पोहोचले, तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.

Screenshot of the video (Photo Credit: X/@PTI)

Pune’s ‘Golden Guys’ Visit Tirumala Tirupati Temple: पुण्यातील ‘गोल्डन गाईज’ म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नानासाहेब वाघचोरे आणि संजय गुर्जर हे सध्या चर्चेत आहेत. या दोघांनी 18 कोटी रुपयांचे 25 किलो सोने परिधान करून आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील प्रसिद्ध व्यंकटेश्वर मंदिराला भेट दिली. सनी आणि संजय हे नेहमीच वजनदार सोने परिधान केल्यामुळे चर्चेत असतात. दोघेही खूप जवळचे मित्र आहेत. अहवालानुसार, सनी अनेकदा 7 ते 8 किलो सोने घालतो, ज्याची किंमत सुमारे 4.5 कोटी आहे. तर बंटी 4 ते 5 किलो सोने घालतो, ज्याची किंमत जवळपास 3.25 कोटी रुपये आहे. या दोघांना महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्यांचे मोबाईल आणि गॅजेट्सही सोन्याने मढवलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही बिग बॉस 16 आणि कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्येही दिसले होते. (हेही वाचा: Asia’s Richest Village: गुजरातमधील 'माधापर' ठरले आशियातील सर्वात श्रीमंत गाव; लोकांकडे आहेत 7000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, जाणून घ्या कारण)

पुण्यातील ‘गोल्डन गाईज’नी तिरुमला तिरुपती मंदिराला भेट दिली-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now