Andhra Pradesh Accident: गुंटूरमध्ये 22 जणांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला, 7 जणांचा मृत्यू; 5 जण गंभीर जखमी (व्हिडिओ पाहा)

जखमींवर गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

Accident (PC - File Image)

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. येथे 22 जणांनी भरलेला ट्रॅक्टर उलटला, ज्यात 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 8 जण जखमी झाले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वट्टीचेरुकुरुजवळ हा ट्रॅक्टर कालव्यात पडला आणि उलटला. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला... इतर चौघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. जखमींवर गुंटूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement