Allahabad High Court ने बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तरूणीने स्वतःहून संकटाला आमंत्रित केल्याचं म्हणत आरोपीला मंजूर केला जामीन
हे प्रकरण सप्टेंबर 2024 चे आहे जेव्हा नोएडा येथील एका विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली महिला तिच्या तीन महिला मैत्रिणींसह दिल्लीतील एका बारमध्ये गेली होती. तिथे तिला काही पुरुष ओळखीच्या व्यक्ती भेटल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक आरोपी होता.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच टिप्पणी करताना पीडीतेने महिलेने स्वतःच संकटांना आमंत्रण दिले होते आणि तिच्यावर झालेल्या कथित बलात्कारासाठी ती जबाबदार होती. असं म्हटलं आहे. दरम्यान नोएडा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या जबाबानुसार, दारू पिऊन ती नशेत होती आणि आरोपी तिच्या जवळ येत होता. ते पहाटे 3 वाजेपर्यंत बारमध्ये राहिले आणि आरोपी तिला तिच्यासोबत येण्यास सांगत राहिला. असे तिने पोलिसांना सांगितले. हे प्रकरण सप्टेंबर 2024 चे आहे जेव्हा नोएडा येथील एका विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली महिला तिच्या तीन महिला मैत्रिणींसह दिल्लीतील एका बारमध्ये गेली होती. तिथे तिला काही पुरुष ओळखीच्या व्यक्ती भेटल्याचे सांगितले जाते, त्यापैकी एक आरोपी होता. Varanasi Shocker: वाराणसी मध्ये 7 दिवसांत 23 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा 19 वर्षीय मुलीचा दावा; 6 जण अटकेत.