Agra: पतीचा प्रेयसीसोबत हॉलेलवर रोमान्स, पत्नीने दोघांनाही बदडले; व्हिडिओ व्हायरल

पत्नीला सोडून भलत्याच विवाहीत महिलेसोबत रोमान्स करणे एका पतीला चांगलेच महागात पडले आहे. हा पती एका भलत्याच महिलेसोबत आगरा येथील हॉटेलवर एका बंद खोलीत रोमान्स करत होता. याच वेळी या व्यक्तीची खरी पत्नी तिथे पोहोचली. पती आणि त्याची प्रेमिका अशा दोघांनाही एकांतात पाहून पत्नीचा पारा चढला.

Wife assaulted husband | Image used for representational Automobile Sector Crisis | Image only representative purpose (Photo Credits: PixaBay)

पत्नीला सोडून भलत्याच विवाहीत महिलेसोबत रोमान्स करणे एका पतीला चांगलेच महागात पडले आहे. हा पती एका भलत्याच महिलेसोबत आगरा येथील हॉटेलवर एका बंद खोलीत रोमान्स करत होता. याच वेळी या व्यक्तीची खरी पत्नी तिथे पोहोचली. पती आणि त्याची प्रेमिका अशा दोघांनाही एकांतात पाहून पत्नीचा पारा चढला. तिने थेट पायतान हातात घेतले आणि दोघांना बदडून काढले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, पती हात जोडून माफी मागत आहे. तर, त्याची प्रेयसी 'पुन्हा असे कधीच करणार नाही.. एक वेळ सोड... पुन्हा नाही करणार' असे म्हणताना दिसत आहे. पण ही महिला दोघांनाही चपलेने हाणत आहे. या घटनेचे आणखी एक व्यक्ती चित्रिकरण करत आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement