Agniveer First Batch: आज भारतीय नौदलात सामील झाली अग्निवीरांची पहिली तुकडी; 273 महिला सैनिकांसह एकूण 2,600 अग्निवीरांचा समावेश (Watch Video)
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत 273 महिला सैनिकांसह एकूण 2,600 अग्निवीर आहेत.
अग्निपथ योजनेंतर्गत भरती होणारी सैनिकांची पहिली तुकडी आज, मंगळवार, 28 मार्च रोजी नौदलात सामील झाली. तब्बल 16 आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम समर्पितपणे पूर्ण केल्यानंतर, भारतातील अग्निवीरांची पहिली तुकडी चमकण्यासाठी सज्ज झाली आहे. आज ओडिशाच्या आयएनएस (INS) चिल्का येथे अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड आयोजित केली होती. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत 273 महिला सैनिकांसह एकूण 2,600 अग्निवीर आहेत. अग्निपथ भरती योजनेअंतर्गत या अग्निवीरांचे प्रशिक्षण नोव्हेंबर 2022 मध्ये आयएनएस चिल्का येथे सुरू झाले होते. पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारची अग्निपथ योजना गेल्या वर्षी 14 जून रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)