Accident In Odisha: रेल्वे अपघातातील जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, पिकअप व्हॅनला धडक

पिकअप व्हॅन आणि बस यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Accident In Odisha: रेल्वे अपघातातील जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, पिकअप व्हॅनला धडक
Bihar Train Accident (PC - You Tube)

रेल्वे अपघातातील जखमींना बालासोरहून रुग्णालयात नेणाऱ्या बसला अपघात झाला. पश्चिम मेदिनीपूरमध्ये बस पिकअप व्हॅनला धडकली. पिकअप व्हॅन आणि बस यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड जाम झाला होता.  ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे, तर 747 लोक जखमी झाले असून 56 जण गंभीर जखमी झाले आहेत. भारतीय रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे. बहनगा बाजार स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा स्टेशनवर थांबा नसल्याने ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2023 07:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).