Assembly Elections 2023 Exit Poll Results LIVE Streaming: विधानसभा निवडणूक AajTak एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

मतदान संपल्यानंतर मतदार आणि राजकीय वर्तुळातील सर्वांनाच उत्सुकता असते ती एक्झिट पोल्सच्या निकालांची.

Voting | Twitter

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सुरु असलेली मतदान प्रक्रिया आज पूर्ण होत आहे. मतदान संपल्यानंतर मतदार आणि राजकीय वर्तुळातील सर्वांनाच उत्सुकता असते ती एक्झिट पोल्सच्या निकालांची. जे आज (गुरुवार, 30 नोव्हेंबर) संध्याकाळी 5:30 नंतर घोषित केले जातील. विविध प्रसारमाध्यमांवरुन हे पोल्स रिजल्ट जाहीर होतील. त्यापैकी विधानसभा निवडणूक AajTak एक्झिट पोल निकाल आपण येथे पाहू शकता. या निवडणुका पाच राज्यांमध्ये होत असल्या तरी त्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. कारण या निवडणुक निकालांना आगामी लोकसभा निवडणूक 2024 ची लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना जनता निवडणार की परिवर्तनाचे संकेत देत काँग्रेस आणि इंडिया आघाडीतल मित्रपक्षांना आपलेसे करणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (हेही वाचा, Assembly Elections 2023 Exit Poll Results LIVE Streaming: विधानसभा निवडणूक ABP News एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)