JN.1 COVID variant cases in India: भारतात नव्या कोविड व्हेरिएंट चे 69 रूग्ण; सर्वाधिक कर्नाटकात

गर्दीच्या ठिकाणी सावधगिरीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आलेलं आहे.

प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

कोविड 19 च्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा नागरिकांची धाकधूक वाढली आहे. ANI Tweets नुसार भारतामध्ये 25 डिसेंबर पर्यंत 69 रूग्णांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक रूग्ण कर्नाटकात असल्याचं समोर आलं आहे. कर्नाटक मध्ये 34 रूग्ण आहेत तर महाराष्ट्रात 9, गोव्यात 14, केरळ मध्ये 6, तामिळनाडू मध्ये 4 आणि तेलंगणामध्ये 2 रूग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी सावधगिरीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन आरोग्य यंत्रणांकडून करण्यात आलेलं आहे. Hingoli Coronavirus Update: रुग्णालयातून कोरोना संक्रमित रुग्ण पळाल्याचा दावा, हिंगोली जिल्ह्यात खळबळ .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now