Hyderabad Shocker: हैदराबादमध्ये बांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
बांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका 5 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. एस जयशिवम असे मृत मुलाचे नाव आहे.
Hyderabad Shocker: हैदराबादमधील संतोषनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी, एका बांधकामाच्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून एका 5 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. एस जयशिवम असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो त्याच्या पालकांसोबत बांधकाम क्षेत्राजवळील एका छोट्या झोपडीत राहत होता, जिथे त्याचे वडील चौकीदार म्हणून काम करायचे. मूळचे रंगा रेड्डी जिल्ह्यातील अमंगल येथील रहिवासी असलेले हे कुटुंब रोजगाराच्या शोधात हैदराबादला आले होते.
खड्ड्यात पडून 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)