Delhi Crime: दिल्लीत भररस्त्यात डिलिव्हरी एजंटला बंदुकीच्या धाकेवर लुटले; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दिल्लीच्या प्रगती मैदान बोगद्यात दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी एका डिलिव्हरी एजंटची कॅब रोखून बंदुकीच्या जोरावर 2 लाख रुपये लुटले. ही घटना 24 जून रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. त्याचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. दोन दुचाकीवर 4 हल्लेखोर एका कारचा पाठलाग करून रस्त्याच्या मधोमध बोगद्यात गाडी थांबवतात. तेवढ्यात एक बदमाश बंदूक काढून गाडीसमोर उभा राहतो. त्यानंतर तीन साथीदार कारचे दोन्ही बाजूचे गेट उघडून रोख रक्कम भरलेली बॅग घेऊन पळ काढतात.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)