'Only Hindus should work at Tirumala': तिरुमला येथे फक्त हिंदू लोकांनीच काम करावे; मंदिराचे नवे अध्यक्ष BR Naidu यांचे विधान

मंदिराचे पावित्र्य राखले पाहिजे, असे ते म्हणाले.

Tirupati Temple | Image Used for Representational Purpose (Photo Credit: PTI)

'Only Hindus should work at Tirumala': आंध्र प्रदेश सरकारने नवीन तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) बोर्डाची घोषणा केली. बीआर नायडू यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. पदभार स्वीकारताना नवनियुक्त अध्यक्ष नायडू म्हणाले की, इतर धर्माच्या लोकांना व्हीआरएस प्रदान करणे हे त्यांचे प्राधान्य आहे. बीआर नायडू पुढे म्हणाले, ‘टीटीडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती मिळाल्याने मी भाग्यवान समजतो. माझी नियुक्ती केल्याबद्दल मी चंद्राबाबू नायडू आणि एनडीए नेत्यांचे आभार मानतो. मी माझ्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानतो. आधीच्या सरकारने इथे खूप चुका केल्या आहेत. मी पाच वर्षांत एकदाही तिरुमलाला भेट दिली नाही कारण मला वाटते की, इथे पवित्रता नाही.’

नायडू यांनी गुरुवारी सांगितले की, भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला येथे काम करणारे सर्व लोक हिंदू असले पाहिजेत. इतर धर्मातील कर्मचाऱ्यांबाबत कोणता निर्णय घ्यावा, त्यांना इतर सरकारी विभागात पाठवायचे की व्हीआरएस (स्वैच्छिक सेवानिवृत्ती) द्यायची याबाबत ते आंध्र प्रदेश सरकारशी बोलतील. मागील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुमलामध्ये अनेक अनियमितता झाल्याचा आरोप नायडू यांनी केला. मंदिराचे पावित्र्य राखले पाहिजे, असे ते म्हणाले. (हेही वाचा: Divorce for Making Fun of Religion: पत्नी उडवायची पतीच्या हिंदू धर्माची खिल्ली; उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट, म्हटले- 'ही मानसिक क्रूरता')

Only Hindus should work at Tirumala:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)