Mysterious Blast In UP: उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये स्फोटामुळे निवासी घरे उद्ध्वस्त, चौकशी सुरू

सीतापूर परिसरात स्फोट झाल्याने निवासी इमारतीचे मोठं नुकसान झाले आहे. आज सकाळी ८च्या सुमारास ही घटना घडली आहे.

Mysterious Blast In UP:

Mysterious Blast In UP:  उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सीतापूर परिसरात स्फोट झाल्याने निवासी इमारतीचे मोठं नुकसान झाले आहे. आज सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच, घटना स्थळी दाखल झाले. सदरपूर पोलीस ठाणे क्षेत्र अधिकारी महमुदाबाद यांच्या देखरेखीखाली या घटनेचा तपास सुरु कऱण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सदरपूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. स्फोट कशाने झाला आहे या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now