Delhi Flood: मुनक कालव्याची भिंत तुटल्याने दिल्लीत पूरस्थिती; गुडघाभर पाण्यातून नागरिकांचा प्रवास (Watch Video)

राजधानी दिल्लीतील जेजे कॉलनीचे नदीत रूपांतर झाले आहे. येथे बुधवारी रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले की रस्त्यांना नदीचे स्वरूप आले.

Delhi Flood: राजधानी दिल्लीतील जेजे कॉलनी(JJ Colony) नदीत बदलली आहे. येथे बुधवारी रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले की रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. हरियाणातून दिल्लीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुनक कालव्याची (Munak canal)भिंत तुटल्याने ही घटना उद्भवली. यानंतर कालव्याचे पाणी नजीकच्या वसाहतींमध्ये शिरले. त्यामुळे हा परिसर जलमय झाला. अचानक पाणी आल्याने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे.(हेही वाचा:Leopard Found in Mahavitaran Office: महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या; राजगुरुनगर येथील घटना (Watch Video))

पोस्ट पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement