Kashmir News: कुपोषणामुळे काश्मीरमधील ‘सर्वात उंच व्यक्ती’चा 38 व्या वर्षी मृत्यू
कश्मीर येथील सर्वात उंच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कुपोषणामुळे त्याचे निधन झाले आहे.
Kashmir News: काश्मीरचा सर्वात उंच माणूस मोहम्मद इक्बाल डूनु, (7.3 फूट उंची) याचे निधन झाले आहे. रविवारी 13 ऑगस्ट रोजी दुपारी वयाच्या 38 व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घतेला. कुपोषणाच्या त्रासाला कंटाळून त्याचे निधन झाले आहे असं समोर आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील घाट रेडवानी पायेन येथील रहिवासी असलेल्या डूनुने 13 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या एका नातेवाईकाने फ्री प्रेस काश्मीरला दिली.“त्याच्या शरीराची हालचाल करता येत नसल्याने त्याचे चुलत भाऊ त्याची काळजी घेत होते. त्याच्या आजारपणानंतर अनेक वर्षे त्याची काळजी घेणाऱ्या त्याच्या आईने दोन वर्षांपूर्वी अखेरचा श्वास घेतला,” तो म्हणाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)