PM Modi On Selfie With Giorgia Meloni: 'मित्रांना भेटणे हा नेहमीच आनंददायी अनुभव'; जॉर्जिया मेलोनीसोबतच्या सेल्फीवर पंतप्रधान मोदींची पोस्ट

त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या सेल्फिवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर त्यांनी म्हटलं आहे की, 'मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते.'

PM Modi Selfie With Giorgia Meloni (PC - Twitter/@narendramodi)

PM Modi On Selfie With Giorgia Meloni: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी दुबईतील COP28 हवामान शिखर परिषदेच्या बाजूला त्यांचे इटालियन समकक्ष जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पोस्ट केलेल्या सेल्फीवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत एक सेल्फी पोस्ट केला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या सेल्फिवर प्रतिक्रिया दिली आहे. यावर त्यांनी म्हटलं आहे की, 'मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायी असते.' पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरून, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, तुर्कस्तानचे अध्यक्ष आरटी एर्दोगन, स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचीही भेट घेतली. (हेही वाचा - Modi Modi In Dubai: पंतप्रधान नरेंद्र मोदी दुबई दौऱ्यावर, एअरपोर्टवर 'अबकी बार मोदी सरकार'चे लागले नारे (Watch Video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif