Delhi News: पार्क केलेल्या कारला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही; दिल्लीतील घटना (Watch Video)
दिल्लीतील अलीपूरमध्ये महामार्गावर एका कारला भीषण आग लागल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.
Delhi News: दिल्लीतील अलीपूरमध्ये महामार्गावर एका कारला भीषण आग लागल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर 44 वर अलीपूर येथील पान ग्रीन हॉटेलजवळ ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्युंदाई सॅन्ट्रोला आग लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि कारमधून मोठी आग निघताना दिसत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती अग्निशमनदलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)