Maha Kumbh 2025: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान (See Pics)

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गुरुवारी त्यांच्या मंत्रिमंडळासह प्रयागराज येथे मंत्र्यांसह पवित्र स्नान केले. त्यावेळी त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी होते.

Photo Credit- X

Maha Kumbh 2025: मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि हरियाणाचे भाजप प्रमुख मोहन लाल बडोली यांनी गुरुवारी सुरू महाकुंभमध्ये (Maha Kumbh 2025) त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. मणिपूरचे मुख्यमंत्री बुधवारी त्यांच्या मंत्रिमंडळासह प्रयागराज येथे दाखल झाले आहेत. 'त्रिवेणी संगमावर गंगा, यमुना यांच्या पवित्र त्रिवेणी संगमावर (Triveni Sangam) उभे राहून देवत्वाचा अनुभव आला. थंड पाण्याचा स्पर्श आत्म्याला होताच केवळ शरीराची धूळच नाही तर असंख्य जन्मांचे ओझेही धुवून टाकले जाते. हात जोडून मी देशाच्या आणि मणिपूरच्या लोकांच्या शांती, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो,' असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी म्हटले. (Prayagraj Maha Kumbh Mela 2025: व्हीव्हीआयपी पास रद्द, वाहन प्रवेशावर बंदी! चेंगराचेंगरीनंतर प्रयागराज कुंभमेळ्यात 5 मोठे बदल लागू)

दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनीही गुरुवारी सकाळी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले. त्याशिवाय, दुसऱ्या दिवशी राम मंदिरात पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर एका दिवसानंतर या घडामोडी घडल्या. पंतप्रधान मोदींच्या भेटीबद्दल आयएएनएसशी बोलताना बिरेन सिंग म्हणाले, 'पंतप्रधान मोदी देश आणि जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी येथे आले. याचा आम्हाला खूप आनंद आहे. मी शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी येथे आलो.'

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now