Mallikarjun Kharge: 'ते व्हिडिओ बनवण्यात माहीर, सोशल मिडीयाद्वारे लोकांना बदनाम करण्याची कल्पना त्यांचीच'; मल्लिकार्जुन खर्गे यांचा भाजपवर पलटवार

मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करत भाजपला आरसा दाखवला आहे. अमित शहा यांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांवर कारवाई केली आहे. यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Mallikarjun Kharge | (Photo Credits: X)

Mallikarjun Kharge: अमित शाह (Amit Shah)यांच्या बनावट व्हिडिओ (Fake Video)बाबत पोलिसांनी आतापर्यंत अनेकांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी पंतप्रधान मोदी (PM Modi)यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'भाजप व्हिडीओ बनवण्यात माहीर आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची बदनामी करण्याच्या कल्पना त्यांचीच आहे.'असे खर्गे म्हणाले, 'भाजप लोकांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करतो, आम्ही ते कधी केले नाही आणि करणार नाही. पंतप्रधान मोदी नेहमीच द्वेषपूर्ण भाषण देतात. द्वेषयुक्त भाषणामुळे समाजात फूट पडते.' (हेही वाचा :Amit Shah Fake Video : अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई, काँग्रेस आणि आपच्या दोघांना अटक; कोण आहेत ते? )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement