Union Budget 2024: देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार; निर्मला सीतारामन यांची घोषणा

तथापी, सरकार 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा देण्यासाठी मॉडेल स्किलिंग लोन योजनेतही सुधारणा करेल.

Finance Minister Nirmala Sitharaman (PC - ANI)

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, 23 जुलै रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर केला. हा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प होता, ज्याने दिवंगत मोरारजी देसाई यांच्या सलग सहा अर्थसंकल्पांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. निर्मला सीतारामन यांनी देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकार आर्थिक सहाय्य करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, सरकार दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना थेट कर्जाच्या रकमेच्या 3 टक्के व्याज सवलतीसह ई-व्हाउचर प्रदान करेल. तथापी, सरकार 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा देण्यासाठी मॉडेल स्किलिंग लोन योजनेतही सुधारणा करेल. याशिवाय, राज्ये आणि उद्योग यांच्या सहकार्याने कौशल्य विकासासाठी एक नवीन केंद्र पुरस्कृत योजना, ज्याचे उद्दिष्ट 5 वर्षांपेक्षा जास्त 20 लाख तरुणांना कौशल्य देण्याचे असणार असल्याचंही यावेळी अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)