Leopard Spotted in Ludhiana: लुधियानातील निवाशी कॅप्लेक्समध्ये बिबट्याचा वावर, रहिवाशांना फुटला घाम; वन विभागाकडून शोध सुरु
पंजाबमधील लुधियाना येथील पक्खोवाल रोडवरील सेंट्रल ग्रीन सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री एक बिबट्याचा वावर होताना दिसला.
Leopard Spotted in Ludhiana: पंजाबमधील लुधियाना येथील पक्खोवाल रोडवरील सेंट्रल ग्रीन सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री एक बिबट्याचा वावर होताना दिसला. रिपोर्टनुसार, एका इमारतीतील रहिवाशांना बिबट्या सोसायटीच्या पार्किंग परिसरात फिरताना दिसला. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही बिबट्याचे दृश्य कैद झाले आहे. त्यानंतर रहिवाशांनी या घटनेबाबत जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती वन विभागाकडे दिली. वनविभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध सुरु आहे. वन विभागाने आसपासच्या परिसरातील नागरिकांना सर्तक राहण्याचे सांगितले.
A leopard entered in Central Green Society on Pakkhowal Road in Ludhiana late at night. A person living in the society spotted the leopard, and the visuals have been captured on the cameras installed in the society. Upon receiving information, the Sadar police station reached the… pic.twitter.com/xSDdZPBye4
— Gagandeep Singh (@Gagan4344) December 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2023 02:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

