Waterlogging in Kolkata Airport: मुसळधार पावसामुळे कोलकाता विमानतळ जलमय, टॅक्सीवेवर विमाने केली उभी
तेथील रनवे आणि टॅक्सीवे दोन्ही तुडुंब भरलेले दिसत आहेत.
Waterlogging in Kolkata Airport: कोलकाता नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Netaji Subhas Chandra Bose International Airport)मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. विमानतळ आणि आसपासचा परिसर जलमय झाला आहे. विमानतळावरील फुटेजमध्ये रनवे आणि टॅक्सीवे दोन्ही पाण्याने तुडुंब भरलेले दिसत आहेत. हावडा, सॉल्ट लेक आणि बराकपूरसह कोलकाता आणि त्याच्या शेजारच्या भागात सततच्या पावसाने थैमान(Kolkata Rain) घातले आहे. कोलकात्याच्या अनेक भागांत पाणी साचल्याची नोंद आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील 12 तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (हेही वाचा:Andheri Subway Close: मुंबईत जोरदार पाऊस; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video) )
कोलकाता विमानतळ जलमय
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)