Kolkatta Accident Video: सॉल्ट लेक परिसरात अपघात, कारला धडक दिल्याने बस पलटली, घटना कॅमेरात कैद

कोलकत्ता येथे सकाळी रस्ता ओलांडताना, कार आणि एका बसचा भीषण अपघात झाला आहे.

Car Bus accident video

Kolkatta Accident Video: कोलकत्ता (Kolkatta) येथे सकाळी रस्ता ओलांडताना, कार आणि एका बसचा भीषण अपघात झाला आहे. स्लॉट लेक परिसरात ही घटना घडली. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. व्हिडिओत दिसल्या प्रमाणे भरधाव बसने कारला धडक दिल्याने बस पलटली आहे.या अपघातात कीमान दहा जण जखमी झाल्याचे माध्यमांना माहिती मिळाली आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 30 लोक होते असे सांगण्यात येत आहे. राज्यातील आयटी हब असलेल्या सॉल्ट लेक सेक्टर V येथून ही माहिती देण्यात आली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटने अंतर्गत चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन बस एकमेकांना ओव्हरटेक करत असल्यामुळे भरधाव बस कारला धडकली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)