Kolkatta Accident Video: सॉल्ट लेक परिसरात अपघात, कारला धडक दिल्याने बस पलटली, घटना कॅमेरात कैद
कोलकत्ता येथे सकाळी रस्ता ओलांडताना, कार आणि एका बसचा भीषण अपघात झाला आहे.
Kolkatta Accident Video: कोलकत्ता (Kolkatta) येथे सकाळी रस्ता ओलांडताना, कार आणि एका बसचा भीषण अपघात झाला आहे. स्लॉट लेक परिसरात ही घटना घडली. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. व्हिडिओत दिसल्या प्रमाणे भरधाव बसने कारला धडक दिल्याने बस पलटली आहे.या अपघातात कीमान दहा जण जखमी झाल्याचे माध्यमांना माहिती मिळाली आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 30 लोक होते असे सांगण्यात येत आहे. राज्यातील आयटी हब असलेल्या सॉल्ट लेक सेक्टर V येथून ही माहिती देण्यात आली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या घटने अंतर्गत चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन बस एकमेकांना ओव्हरटेक करत असल्यामुळे भरधाव बस कारला धडकली.
3rd Oct, 2023. Kolkata Sector 5 bus accident pic.twitter.com/nbNQuAL0jC
— Saddam Hossain (@bestheart0027) October 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 03:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

