Kolihan Mine Accident: राजस्थान येथे खाणीत लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा बाहेर कराढण्यात यश, एकाचा मृत्यू (Watch Video)
त्यांच्या बचावात पथकाला यश आले असून १४ जणांची सुटका करण्यात आली आहे. दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला.
Kolihan Mine Accident: राजस्थान मधील झुंझुनू जिल्ह्यातील कोलिहान खाणीत(Kolihan Mine)काल रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली होती. लिफ्ट कोसळल्याने १४ जण खाणीत अडकले होते. आता तेथे बचाव कार्य (Rescue Operation)नंतर १४ जणांना सुखरूप बाहेर काझण्यात आले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेत आधीच तिघांना बाहेर काढण्यात आले होते. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड(Hindustan Copper Limited)ची तांब्याच्या धातूची ही खाण आहे. तांब्याची खाण 1967 मध्ये स्थापन झाली. अडकलेले सर्व सुरक्षित असल्याची माहिती घटनास्थळावरील डॉक्टरांनी दिली आहे. त्याशिवाय, सतर्कतेची काळजी म्हणून नऊ रुग्णवाहिका खाणीबाहेर स्टँडबाय ठेवण्यात आल्या होत्या. (हेही वाचा: Jhunjhunu Mine Accident : राजस्थान मध्ये खाणीत लिफ्ट कोसळल्याने १४ जण अडकले, बचाव कार्य सुरू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)