Karnataka High Court Judges Get Death Threats: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतील संदेशात मुरलीधर आणि न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, न्यायमूर्ती एचटी नरेंद्र प्रसाद, न्यायमूर्ती अशोक जी निजगन्नावार (निवृत्त), न्यायमूर्ती एचपी संदेश, न्यायमूर्ती के नटराजन आणि न्यायमूर्ती बी वीरप्पा (निवृत्त) यांच्यासह उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना 'दुबईच्या टोळी'द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

Karnataka High Court (Photo Credits: ANI)

Karnataka High Court Judges Get Death Threats: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या प्रेस रिलेशन ऑफिसरने स्वत:सह अनेक न्यायाधीशांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर येथील सेंट्रल सीईएन गुन्हे पोलीस स्टेशनने अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. के मुरलीधर यांनी 14 जुलै रोजी तक्रार दाखल केली. त्यांना 12 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेंजरवर संदेश आले होते. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतील संदेशात मुरलीधर आणि न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, न्यायमूर्ती एचटी नरेंद्र प्रसाद, न्यायमूर्ती अशोक जी निजगन्नावार (निवृत्त), न्यायमूर्ती एचपी संदेश, न्यायमूर्ती के नटराजन आणि न्यायमूर्ती बी वीरप्पा (निवृत्त) यांच्यासह उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना 'दुबईच्या टोळी'द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now