Jharkhand Road Accident Video: झारखंडमध्ये भीषण अपघात, एलपीजी सिलिंडरने भरलेला ट्रक उलटला, घटनेत एकाचा मृत्यू
झारखंडमधील गोड्डा येथे रविवारी एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रक उलटल्याने एका 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
Jharkhand Road Accident Video: झारखंडमधील गोड्डा येथे रविवारी एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रक उलटल्याने एका 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गोड्डा लालमाटिया रोड परिसरात वाहन उलटले. या अपघातात सहाहून अधिक लोक जखमी झाले. ट्रक चालकाने मोटारसायलकलस्वाराला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ठाकूरगंटी पोलिस स्टेशन हद्दीतली बभनिया, कोलबड्डा येथील 46 वर्षीय प्रेमकुमार पवन असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर प्रेमकुमार यांना महागामा रेफरल रुग्णालायत दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)