Jharkhand Accident News: धक्कादायक, सेल्प घेताना कार वरिल नियत्रंण सुटलं, गाडी बॅरेजमध्ये पडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, चालक जखमी

दसऱ्याच्या दिवशी एका कुटूंबावर काळाने घात केला आहे.

Car accident

Jharkhand Accident News: झारखंडच्या देवघर जिल्ह्यात एक दुर्घटना घडली आहे. दसऱ्याच्या दिवशी एका कुटूंबावर काळाने घात केला आहे. मंगळवारी कारने जात असताना, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. सेल्पी घेत असताना अचानक कार वरील नियत्रंण सुटल्याने कार पुलावरून सिक्तिया बॅरेजमध्ये पडल्याने अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक जखमी झाला आहे. देवघरच्या सरथ येथील आसनसोल संकुल गावातून गिरीडीहला जात असताना हा अपघात झाला. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीने कार  बॅरेजमधून बाहेर काढण्यात येत आहे. अधीक माहिती प्रतिक्षेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)