Banks Open on Sunday 27th September: ग्राहकांच्या सोयीसाठी रविवारी 27 सप्टेंबर रोजी बँका सुरू राहणार

बँक ग्राहकांचे हित आणि सोय ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, याचा पुनरुच्चार विभागाने केला आहे. सरकारने आणि बँक व्यवस्थापनांनी कर्मचारी संघटनांना प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे, तसेच अत्यावश्यक बँकिंग सेवा विनाअडथळा सुरू राहतील याची खात्री करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या आहेत.

New India Co-operative Bank (फोटो सौजन्य - ट्विटर)

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत पुकारलेला तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप आणि त्याआधी येणाऱ्या 26 व 27 सप्टेंबरच्या सुट्ट्या लक्षात घेऊन, नागरिकांच्या बँकिंग गरजांची पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. जनतेच्या बँकिंगविषयक महत्त्वाच्या गरजांवर दीर्घकाळ विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका रविवारी 27 सप्टेंबर 2026 रोजी नेहमीप्रमाणे कामकाज करतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 27 सप्टेंबर 2026 रोजी सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संलग्न शाखा आणि करन्सी चेस्ट पूर्णपणे कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement