Anant Ambani Birthday 2025: रिलायन्स इंडस्ट्रीजचा संचालक अनंत अंबानीचा 30 व्या वाढदिवसानिमित्त संकल्प; करत आहे जामनगर ते द्वारका अशी 140 किमीची पदयात्रा (Video)

अनंत अंबानीने सांगितले की, त्याची पदयात्रा जामनगरमधील त्यांच्या घरापासून सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून हा प्रवास सुरू आहे, जो द्वारका इथे संपेल. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Anant Ambani, Director of Reliance Industries Limited (Photo Credits: X/ANI)

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. अनंत अंबानी गुजरातमध्ये 140 किलोमीटरहून अधिक अंतराची पदयात्रा करत आहे. जामनगर ते द्वारकाधीश मंदिर अशी ही यात्रा आहे. अनंत अंबानीने सांगितले की, त्याची पदयात्रा जामनगरमधील त्यांच्या घरापासून सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून हा प्रवास सुरू आहे, जो द्वारका इथे संपेल. सध्या याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अनंत अंबानी म्हणाला, ‘गेल्या 5 दिवसांपासून ही पदयात्रा सुरू आहे आणि आम्ही आणखी 2-4 दिवसात पोहोचू. भगवान द्वारकाधीशाचे आशीर्वाद आम्हाला लाभो. मी तरुणांना सांगू इच्छितो की भगवान द्वारकाधीशांवर श्रद्धा ठेवा आणि कोणतेही काम करण्यापूर्वी भगवान द्वारकाधीशांचे स्मरण करा, काळजी करण्याची काहीच कारण नाही.’

अनंत अंबानीने 10 एप्रिल रोजी द्वारकेत भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेऊन त्याचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला आहे. अनंत अंबानींच्या या धार्मिक यात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्यच्या प्रवासादरम्यान, संपूर्ण वाटेत पोलीस आणि खाजगी सुरक्षा एजन्सी त्याच्यासोबत असतात. (हेही वाचा: Chardham Yatra 2025: यंदा 30 एप्रिलपासून सुरु होणार चारधाम यात्रा; अक्षय्य तृतीयेला उघडणार गंगोत्री, यमुनोत्री धामचे दरवाजे)

Anant Ambani Birthday 2025:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement