Agnipath Scheme: सावधान! अग्निपथ योजनेची व्हॉट्स अॅपद्वारे बनावट नोंदणी, जाणून घ्या योग्य आणि अधिकृत नोंदणी स्थळ

भारतीय लष्कराकडून अग्निपथ योजनेच्या नोंदणीसाठी कुठलाही व्हाट्स अॅप नंबर जारी करण्यात आलेला नाही, अशी माहिती प्रेस इन्फॉरमेसन ब्यूरोकडून देण्यात आली आहे.

Fake news on WhatsApp | (Photo Credits: File Image

अग्निपथ योजनेची (Agnipath Scheme) नोंदणी व्हॉट्स अॅपद्वारे (Whats App) केली जात आहे, अशी एक बनावट पोस्ट सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. तरी ही पोस्ट बनावट असुन भारतीय लष्कराकडून (Indian Army) अग्निपथ योजनेच्या नोंदणीसाठी कुठलाही व्हाट्स अॅप नंबर जारी करण्यात आलेला नाही, अशी माहिती प्रेस इन्फॉरमेसन ब्यूरोकडून (Press Information Bureau) देण्यात आली आहे. तरी अग्निपथ योजनेसाठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या या तीन

1. https://joinindianarmy.nic.in

2. https://indianairforce.nic.in

3. https://joinindiannavy.gov.in

अधिकृत संकेतस्थळावर  नोंदणी करु शकतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)