Tiruchirappalli Airport: चेन्नईहून आलेल्या इंडिगो विमानाचे तिरुचिरापल्ली विमानतळावर पाण्याच्या फवारांच्या सलामीने स्वागत; नवीन टर्मिनल कार्यान्वित (Watch Video)

ज्यात चेन्नईहून आलेल्या इंडिगो विमानाचे पाण्याच्या फवारांनी स्वागत करण्यात आले.

Photo Credit-X

Tiruchirappalli Airport: तिरुचिरापल्ली विमानतळावरील नवीन टर्मिनलची इमारत आज, 11 जून कार्यान्वित करण्यात आली. ज्यात चेन्नईहून आलेल्या इंडिगो विमानाचे पाण्याच्या फवारांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत उद्घाटन केलेल्या एकात्मिक टर्मिनल विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. चेन्नईहून आलेले हे विमान नवीन टर्मिनलवर उतरणारे पहिले विमान होते. एएनआय या वृत्तसंस्थेने वॉटर कॅननच्या सलामीचा क्षण टिपणारा व्हिडिओ फुटेज शेअर केला आहे. (हेही वाचा:Mangaluru BJP workers Brutally Stabbed: कर्नाटकात दोन तरुणांची चाकूने भोसकून हत्या, भाजपचा कॉंग्रेस सरकारवर टीका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)