Mangaluru BJP workers Brutally Stabbed: कर्नाटकात दोन तरुणांची चाकूने भोसकून हत्या, भाजपचा कॉंग्रेस सरकारवर टीका
कर्नाटकातील मंगळुरुमध्ये दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर खात्यावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Mangaluru BJP workers Brutally Stabbed: कर्नाटकातील मंगळुरुमध्ये दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर खात्यावर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. कर्नाटकातील सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस सरकारवर टीका केली. स्कूटरवरून जात असताना भारत माता की जय असा नारा देणाऱ्या लोकांचा पाठलाग करताना दिसत आहे. गोळीबारच्या घटनेंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- शिवराज चव्हाण यांच्या रुपात केंद्रीय कृषीमंत्री पद पुन्हा एकदा मध्य प्रदेश राज्याकडे
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने या घटनेनंतर व्हिडिओ पोस्ट केला आणि सिध्दरामय्या यांच्या नेतृत्त्वाखाली कॉंग्रेस सरकारवर बोचरी टीका केली आणि पुढे म्हणाले की, त्यांच्या राजवटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. हल्ला झालेले तरुण हे भाजपचे कार्यकर्ते आहे. हरिश अंचन आणि नंदकुमार अशी हल्ल्यात मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. रविवारी रात्री भाजपचे दोन कार्यकर्ते स्कूटरवरून परिसरात फिरत होते आणि भारत माता की जय अशी घोषणा करत होते.
It feels like the Thuglak era is back in Karnataka, where shouting "Bharat Mata Ki Jai" is no longer safe. The growing hatred for Bharath under @siddaramaiah is deeply alarming. BJP workers Harish Anchan and Nandakumar, who were celebrating PM Modi's electoral victory and… pic.twitter.com/hy63GJjHsB
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) June 10, 2024
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन तरुणांच्या मागे जमाव पाठलाग करत आहे. त्यानंतर संतप्त जमावाने मारले. या मारहाणीत दोन्ही तरुणांचा एका जणाने चाकून भोसकले. यात त्यांचा जागीच जीव गेला. घोषणा करत असल्याने जमावाला संताप आला होता. भाजपने दावा केला की, जमावाने तरुणाना क्रूरपणे मारहाण करून चाकूने त्यांची हत्या केली. हे घृणास्पद कृत्य कॉंग्रेस सरकारच्या काळात होत आहे. कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2024 07:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

