Goldman Sachs On Indian Economy: भारत 2075 पर्यंत US युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; Goldman Sachs ची भविष्यवाणी

पुढील दोन दशकांत, भारताचे अवलंबित्व प्रमाण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात कमी असेल, असे गोल्डमन सॅक्स यांनी म्हटलं आहे.

Economy | Representational image (Photo Credits: pxhere)

Goldman Sachs On Indian Economy: भारत 2075 पर्यंत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे, केवळ जपान आणि जर्मनीच नव्हे तर भारत यूएसलाही मागे टाकणार आहे, असं गोल्डमन सॅक्स यांनी म्हटलं आहे. सध्या, जर्मनी, जपान, चीन आणि यूएस नंतर भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. पुढील दोन दशकांत, भारताचे अवलंबित्व प्रमाण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात कमी असेल, असे गोल्डमन सॅक्स यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Highest Average Salary; महाराष्ट्रातील 'या' शहरात मिळतो देशातील सर्वाधिक सरासरी पगार; मुंबई, बेंगळुरू, दिल्लीला टाकले मागे)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)