Viral Video: बिजनौरमध्ये 25 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीच्या वेगवान प्रवाहात अडकली; पहा व्हिडिओ

क्रेनच्या सहाय्याने वाहन उलटू नये यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Bus stuck in a fast-flowing river (PC - Twitter)

Viral Video: उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधून इंटरनेटवर एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक प्रवासी बस नदीला आलेल्या पुरात अडकलेली दिसत आहे. कोतवाली मोसमी नदीच्या वेगवान प्रवाहात हरदिवार-बिजनौर मार्गावरील मांडवली भागात बस अडकल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

व्हिडिओमध्ये, नदीच्या प्रवाहात अडकलेल्या प्रवाशांनी बस भरलेली दिसत आहे. काही जण त्यांच्या खिडक्यांमधून डोकावण्याचा प्रयत्न करतात, तर काहीजण त्यांच्या जागेवर असहाय बसलेले दिसतात. हा व्हिडिओ जवळच्या एका पुलावर उभ्या असलेल्या व्यक्तीने शूट केला आहे, जिथे बस प्रवाशांच्या मदतीसाठी क्रेन आल्याचे दिसत आहे. क्रेनच्या सहाय्याने वाहन उलटू नये यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Man Gets Stuck in Mud: पिंपरी चिंचवड मध्ये मॉनिंग वॉकला निघालेला व्यक्ती चिखलात पाय रूतून अडकला; अशी झाली सुटका (Watch video))

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)