Viral Video: भुवनेश्वर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालकाने स्कूटीला फरफटत नेलं, भयावह व्हिडिओ व्हायरल

ओडिशाच्या भुवनेश्वरमधील पाटीया - नंदनकानन रस्त्यावर एका कारने स्कूटरला सुमारे एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

CAR VIDEO PC TWITTER

Viral Video:  ओडिशाच्या भुवनेश्वरमधील पाटीया - नंदनकानन रस्त्यावर एका कारने स्कूटरला सुमारे एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. वृत्तानुसार कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कार चालकाने कार चालवणे सुरुच ठेवले, सुदैवाने स्कूटरवर कोणीही नव्हते. त्यामुळे जीवीतहानी टळली, या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी चालकावर कारवाई केली. चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. शिवाय, घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement