Kanpur Road Accident: कानपूरमध्ये भीषण अपघातात; 27 जण जागीच ठार, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 14 मुले आणि 13 महिला असल्याची माहिती आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेले लोक उन्नाव जिल्ह्यात असलेल्या माँ चंद्रिका देवीचे दर्शन घेऊन परतत होते. घटनास्थळी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा (Kanpur Road Accident) अपघातात झालाय. या अपघातात 27 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत आहे. ट्रॅक्टर-टॅलीचे नियंत्रण न झाल्याने हाडासा झाला. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये सुमारे 50 जण होते, असे सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 14 मुले आणि 13 महिला असल्याची माहिती आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेले लोक उन्नाव जिल्ह्यात असलेल्या माँ चंद्रिका देवीचे दर्शन घेऊन परतत होते. घटनास्थळी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतरांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जातील, अशी माहिती पीएमओने दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)