Ratan Tata Clarification on Cricketer: माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही; रतन टाटांनी का केलं 'असं' वक्तव्य? जाणून घ्या

क्रिकेटशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, मी आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट फॅकल्टीला कोणत्याही क्रिकेट सदस्याला कोणत्याही खेळाडूला दंड किंवा बक्षीस देण्याबाबत कोणतीही सूचना केलेली नाही.

Ratan Tata (Photo Credits: Getty Images)

Ratan Tata Clarification on Cricketer: रतन टाटा (Ratan Tata) यांनी अलीकडेच X (पूर्वीचे ट्विटर) आयसीसी किंवा क्रिकेट अधिकाऱ्यांशी झालेल्या कोणत्याही चर्चेत त्यांचा सहभाग असल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. क्रिकेटशी आपला कोणताही संबंध नसल्याचं सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, मी आयसीसी किंवा कोणत्याही क्रिकेट फॅकल्टीला कोणत्याही क्रिकेट सदस्याला कोणत्याही खेळाडूला दंड किंवा बक्षीस देण्याबाबत कोणतीही सूचना केलेली नाही. माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. कृपया व्हॉट्सअॅप फॉरवर्डवर विश्वास ठेवू नका. रतन टाटा यांनी क्रिकेटपटू राशिद खानला 10 कोटी रुपये देण्याचे वचन दिल्याचा आरोप व्हायरल झालेल्या फेक न्यूज रिपोर्टनंतर करण्याता आला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)